Uncategorized

आवरगाव हे राज्यातील आदर्श गाव, न्यायाधीश कदम यांनी नागरिकांचे अधिकार आणि कायदा गावकर्‍यांना समजावून सांगितला, आवरगाव येथील कायदे विषयक शिबीराला मिळाला भरभरून प्रतिसाद, सरपंच जगताप म्हणाले, संस्कारमय पिढीच देशाचं खर भविष्य


धारूर, दि. 17 (लोकाशा न्यूज) : तालुका विधी सेवा समिती धारूर व विधिज्ञ संघ धारूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आवरगाव येथे कायदे विषयक शिबीर घेण्यात आले. या वेळी धारूर न्यायालयाचे न्यायाधिश श्री कदम यांनी मुख्यमार्ग दर्शक म्हणुन मार्गदर्शन केले, ते बोलतांना म्हणाले आवरगाव हे राज्यातील आदर्श गाव आहे, आपल्या गावात वाद तंटे नाहीत तुमच गाव हे तंटामुक्त गाव आहे. सर्व गोष्टी असल्या तरी काही चुकीच्या प्रवृती गावात निर्माण होउ नयेत म्हणून कायद्याची माहिती, ज्ञान गावकर्‍यांना असणे आवश्यक आहे. त्यांनी महिलांचे अधिकार, बालकांचे अधिकार तसेच जेष्ठ नागरिकांविषयी कायदा समजावून सांगीतला व गावाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कायदे विषयक शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार सरपंच अमोल जगताप यांनी मानले. ते म्हणाले, की सर्व कायदे पंडीत आज आपल्या गावात आले आहेत, सर्वांनंी आपल्याला वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले, आमच्या गावकर्‍यांच्या ज्ञानात भर पडली, आपल्या सर्वांच्या बोलण्यातून असे लक्षात आले की जे लोक आपल्या परंपरेने वडीलधार्‍या लोकांनी दिलेले संस्कार जपत नाहीत, म्हणजेच व्यसनी, व्यभीचारी करतात, परधन, परस्त्री यांना बळकवण्याचा पर्यत्न करतात, त्यांच्यासाठी कायदा आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मुलांना संरकार द्या, संस्कारमय पिढीच देशाच खर भविष्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!