Uncategorized

अतिवृष्टी अन् पूरग्रस्तांना 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य, जिरायतीसाठी प्रती हेक्टरी 10 हजार तर बागायतीसाठी 15 हजार रूपयांचा मिळणार मदत, मुख्यमंत्री ठाकरेंनी केली घोषणा


मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी 10 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.
राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही मदत पुढील प्रमाणे
जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति
हेक्टर ही मदत 2 हेक्टर मर्यादित

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!