Uncategorized

एसपींच्या विशेष पथकाचा सिंदफणा नदीपात्रात छापा, वाळू माफियांवर केली कारवाई, 54 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 12 आरोपींवर गुन्हा दाखल


बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : दि. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आहेरचिंचोली गावाजवळ असणार्‍या सिंदफणा नदीपात्रामध्ये वाळू माफियांवर छापा मारला असता तेथे दोन जेसीबी व चार ट्रॅक्टर असे सहा वाहने जागीच पकडण्यात आले, त्यामध्ये तीन वाहनांचे चालक जागीच पकडण्यात आले. या कारवाईमध्ये दोन जेसीपी आणि चार ट्रॅक्टर असे 54 लाख 49 हजार एवढ्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरसीपीतील पोलीस कर्मचारी बालाजी बास्तेवाड यांच्या फिर्यादीवरून पकडण्यात आलेल्या तीन आरोपींसह इतर वाहनांचे फरार चालक व मालक असे एकूण बारा आरोपींविरुद्ध भा द वि-379, 511, 109, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक बीड यांच्या पथकाने केली असून त्यामध्ये सपोनि विलास हजारे, पोलीस शिपाई बालाजी बासत्येवाड, संभाजी भिलारे,आणि एकनाथ पवार यांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!