केज दि .4 – तालुक्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या भावकितील नराधमाने शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे . केज तालुक्यातील एका गावात एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्याच भावकितील नराधमाने , तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणुन त्याच्या शेतामध्ये नेऊन तिच्या सोबत वारंवार बलात्कार केला . त्यातून ती अल्पवयीन पीडित मुलगी पाच महिण्याची गोरदर राहिली आहे . दि . 4 ऑक्टोबर रोजी पीडित मुलीने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन तिच्या भावकितील नराधमाच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात भा द वी 376 ( 376 ( एन ) 376 ( एफ ) यासह अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा ( पोक्सो कलम 4 व 6 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी आणि रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत .