Uncategorized

भटक्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण महाआघाडी सरकारने केले रद्द,प्रतिज्ञापत्र मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन करणार- डॉ. लक्ष्मण जाधव

*बीड ( प्रतिनिधी):- भटक्या विमुक्तांना नोकरीत पदोन्नती देता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र राज्यशासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने राज्यातील हजारो भटक्या-विमुक्त समाजातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या विरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे असून तातडीने हे अन्यायकारक प्रतिज्ञापत्र मागे घावे अन्यथा याविरोधात जिल्हाभर तीव्र आंदोलन लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे, डॉ. प्रीतमताई साहेब मुंडे व प्रदेश अध्यक्ष नरेंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशावरून व भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्याचा भाजपा भटके- विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
याबाबत डॉ. लक्ष्मण जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांना आज निवेदन पाठवून समाजावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे अनुसूचित जाती व जमातीला पदोन्नतीत आरक्षण देता येते तर भटक्या विमुक्तांना आरक्षण देणे असंविधानिक आहे असा सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात उल्लेख करणे म्हणजे दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार असून हजारो भटक्या-विमुक्तावर अन्याय करणारा आहे
याबाबत शासनाने तातडीने पाऊले उचलून प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला युक्तिवाद रद्द करून भटक्या-विमुक्तांनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे अन्यथा भटक्या विमुक्त आघाडीतर्फे समाज्याच्या न्याय मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले जाईल असे डॉ. लक्ष्मण जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा गोंधळ, ओबीसींवर अन्याय व आता भटक्या-विमुक्त समाजाला पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचे पाप महाविकास आघाडीचे सरकार करीत असून आता जनताच या महाविकास आघाडीला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी जिल्हाभर लोकनेत्या पंकजाताई साहेब मुंडे, प्रीतमताई साहेब मुंडे, प्रदेश अध्यक्ष नरेंद्रजी पवार साहेब व जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर फिरुन या भटक्या -विमुक्त जाती जमातीतील लोकांना राज्यघटनेतील सामाजिक न्याय व हक्कासाठी संघटित करून,या महाविकास आघाडीने केलेल्या पदोन्नतीतील आरक्षण,भटक्या-विमुक्त,ओबीसींचे राजकीय आरक्षण,महाज्योती संस्थेला भरीव निधी, वसंतराव नाईक महामंडळात भरघोस निधीची तरतूद करावी,नाँन क्रिमीलिकरचु अट रद्द करावी,जातिनिहाय जणगणंना करावी,जिल्हास्तरीय वसतिगृह निर्माण करावेत व स्काँलरशिपचे तात्काळ वाटप करण्यात यावे या संदर्भात जिल्हाभर भटके-विमुक्त जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून यासंदर्भात व्यापक लढा उभारण्याची गरज आहे असे भाजपचे भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी सांगितले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!