केज दि .20 – केज उपविभागाला पंकज कुमावत ( आयपीएस ) दर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लाभले आहेत . बऱ्याच कालावधीनंतर एक धाडसी आणि तरुण अधिकारी लाभल्याने अवैध घंद्यांवर अंकुश येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे . अखिलेश कुमार सिंग यांच्यानंतर केज उपविभागाचा कारभार हा बरेच वर्ष अतिरिक्त कार्यभारावर चाललेला आहे . पदाचे आले परंतु त्यांचाही कार्यकाळ जास्त दिवसाचा न राहिल्याने त्यांनाही आपली छाप पाडता आली नव्हती . केज उपविभाग तसा लहान जरी असला तरी गुन्हेगारीचे प्रमाण त्या मानाने जास्त आहे . महिला अत्याचार , चोऱ्या , मारामाऱ्या , अवैध धंदे यासारखे गुन्हे उपविभागात लक्षणीय आहेत . या सर्व गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याचे काम पंकज कुमावत यांना करावे लागणार असून उपविभागतील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत . दरम्यान , मूळचे राजस्थान येथील असलेले पंकज कुमावत हे 2019 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत . दि .19 रोजी त्यांनी केज येथे आपल्या पदाचा अधिभार घेतला असून उपविभागातील परिस्थितीचा आढावा घेत लागलीच कामाला सुरुवात केली आहे .