अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
तालुक्यातील ममदापूर येथे दहा हजार रुपये किमतीचा बकरा चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ममदापूर येथील टायर पंचर दुकानदार शेख खाजामियाँ शेख रशीद (वय ४५) यांच्या मालकीचा दहा हजार रुपये किमतीचा एक बकरा आरोपीने त्यांच्या घरासमोरून लबाडी च्या उद्देशाने चोरून घेऊन जात असताना दिसून आले. याप्रकरणी शेख खाजामियाँ शेख रशीद यांच्या फिर्यादीवरुन मयूर गोविंद दळवी, गोकुळ गोविंद दळवी ( दोघेही रा. मोरेवाडी) यांच्या विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं २८१/ २०१ कलम ३७९, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस जमदार