अंबाजोगाई/प्रतिनिधी:
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना दि.14 फेब्रुवारी 2017 ते दि.31 जानेवारी 2021 दरम्यान घडली. याप्रकरणी बुधवार दि.8 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.यातून फिर्यादि गरोदर असल्याची माहिती झाल्यावरून आरोपीने फिर्यादी च्या घरी जाऊन एक महिन्याच्या आत तुझ्याशी लग्न करतो असा विश्वास देऊन फिर्यादी च्या इच्छेविरुद्ध कसलीही संमती नासताना आरोपी ने बळजबरीने कोणत्यातरी दोन गोळ्या खावू घातल्या त्याच दिवशी फिर्यादी चा गर्भपात झाल्यानंतर आरोपीने पुढील उपचारासाठी कलावती हॉस्पिटल अंबाजोगाई येथे घेऊन गेला. त्यानंतर सदर बाबीविषयी कोणाकडे वाच्यता जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा कारणावरून 32 वर्षीय महिलेच्या फिर्यादी वरून आरोपी अमोल लक्ष्मण पौळे याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर347/2021कलम 376,313,506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार हे करत आहेत.