बीड, जिल्ह्यातील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ बीड दि .8 – सर्व कुटुंब रात्री झोपीत असताना सर्पदंश झाल्याने दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला . तर आईवर उपचार सुरु आहेत . हि घटना केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली . केज तालुक्यातील सोनेसंगवी 2 येथील दीपक साखरे हे त्यांच्या पत्नी जयश्री साखरे यांच्यासह त्यांच्या 5 व 3 वर्षाच्या दोन मुली असे संपूर्ण कुटुंब झोपी गेले होते . परंतु रात्री 17 ते 12 च्या दरम्यान दीपक यांची पत्नी जयश्री व त्यांच्या दोन मुलींना सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले . दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर तिघींनाही अंबाजोगाई येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले . परंतु उपचारादरम्यान दोन्हीही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जयश्री यांच्यावर उपचार सुरु आहेत . सदरील दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .