बीड, कालावधी पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी आनंद भंडारी यांची पुणे येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे, मागील दोन वर्षांच्या काळात त्यांनी बीड जिल्ह्यात अत्यांत चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजावलेले आहे, यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक कामांना गती मिळाली आहे, जिल्हा त्यांची कार्यकिर्द कधीच विसरू शकणार नाही.