परभणी, दि. 27 (लोकाशा न्यूज) : स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक याच्या विशेष पथकाने काल पहाटे मदिना पाटी परिसरात कारवाई करत एका चारचाकी वाहनातून तसस्करी होत असलेला अवैध गुटखा पकडला आहे. यामध्ये 3 लाख 20 हजार 280 रुपयांच्या गुटक्यासह 11 लाख 20 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 9 आरोपीविरोधात नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कर्मचारी संतोष सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आरोपी आदिल खान जाफर खान (पठाण), सय्यद तय्याब, वसीम खान, गफार मकदुम काकर, मुस्तक खान शब्बीर खान (तांबोळी) अल्ताब पठाण सरदार पठाण, फेरोज वहाब पठाण, वहिद खान (शेख), रिजवान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आदिल पठाण यास ताब्यात घेण्यात आले आहे. एक इनोव्हा गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे दिसतच पोलिसांनी या गाडीचा संशय आल्याबरोबर या गाडीचा पाठलाग करत एम एच 04 सी जी 9908 हे वाहन थांबवण्यात आले असता यामध्ये राजनिवस, जफराणी जर्दा, आदी सह अवैध गुटखा जप्त करत ही कार्यवाही केली. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी लटपटे, सय्यद जाकेर, घोडके,दीपक मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, तुपसुंदरे, दिलावर खान, किशोर चव्हाण , शेख अजहर, हरी तुपसे, सय्यद मोबीन, संतोष सानप, निळे तसेच नवा मोंढा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही धडाकेबाज कार्यवाही केली. बीड जिल्ह्यातील परळी येथील वरील 9 ओरोपी असून या आरोपींची जिल्ह्यात सर्व यंत्रणा मॅनेज करत अवैध गुटख्याच्या बाजार मांडला होता मात्र यांच्यावर अध्यप एकही मोठी कार्यवाही करण्यात आली नव्हती.मात्र परभणी पोलिसांनी हिम्मत दाखवीत ही धडाकेबाज कार्यवाही केल्याने परळीत परभणी पोलिसांची वाहवाई करण्यात येत आहे.