देश विदेश

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन तर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव

बीड – कोरोनाच्या भीतीने रस्ते निर्मनुष्य असतांना, कोरोनाची भीती झुगारून तो तरुण रस्त्यावर उतरला, मदतीचा हात देत राहिला, हजारो कुटूंबाच्या चुली पेटवल्या, अनाथांना आधार देत माणुसकीचा धर्म पाळत राहीला, भुकेलेल्याना अन्न दिले, बंद चुली पेटवण्यासाठी जीवनावश्यक साहित्य दिले, रुग्णालयात उपचारासाठी खिशात दमडी नव्हती त्याचे बिले भरले, तर गरज असलेल्याना रक्त दिले, काम सोपं नव्हतं मात्र त्या तरुणाच्या आधारामुळे हजारो कुटूंबाचे जगणे सोपे झाले याच कामाची पावती मिळाली, या अनन्य साधारण कामगिरी मूळे बीड चे शिवसेना नगरसेवक व राजयोग फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम दिलीप धुत यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन ने सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट या पुरस्काराने सन्मानित केले .
कोरोनाच्या महामारीत कोरोनाच्या पहिल्या अन दुसऱ्या लाटेत जनसामान्यांसाठी केलेल्या कामगिरीसाठी सर्वात कमी वयात पुरस्कार मिळवणारा तरुण म्हणून ही शुभम चा गौरव करण्यात आला. काल दि.२३ जुलै रोजी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबूब सय्यद, वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आदम सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद, रुमा सय्यद यांच्या हस्ते हा सन्मान पुण्यातील हॉटेल हयात येथे नगरसेवक शुभम धुत यांना प्रदान करण्यात आला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन झाले, कोरोनाच्या भीतीने माणसातील माणुसकी सुद्धा भयभीत झाली होती, मदतीला कोणी यायला तयार नव्हते, हातातील काम गेले होते, उद्या काय खावे याची चिंता होती, अनाथला आधार नव्हता, अशा संकट काळात कोरोनाची भीती झुगारून शुभम धुत रस्त्यावर उतरला होता, सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त मदतीचा यज्ञ सुरू होता, वार्डा वॉर्डात जाऊन मदतीचे वाटप सुरू होते, मंदिर- मस्जित, चर्च, सर्व आश्रमा पासून स्मशान भूमीत वास्तव्य करणाऱ्या, चर्च व कब्रस्तान ची देखभाल करणाऱ्या नागरिकापर्यंत किराणा सामानाच्या किट पोहोच केल्या शहरातील हजारो नागरिकांना मदत पोहोचवून वाडी वस्तीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन आवश्यक मदतीचा ओघ पोहोचवत होता, अशा संकटकाळात बीड शहरासह ग्रामीण भागात सतत ५० दिवस राजयोग फाउंडेशन च्या माध्यमातून स्वत: अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप, कोरोना च्या दुसर्‍या लाटेत ही सर्व सामान्य नागरिकांना कोरोना वॉर्डात जाऊन आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याबरोबरच, या २ दोन वर्षांत राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा असताना अत्यावश्यक रुग्णांना ३ वेळा स्वत: O निगेटिव्ह रक्त दिले, त्याचबरोबर गरजू कुटुंबांना दिवाळी व ईद साजरी करण्यासाठी आवश्यक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन च्या वतीने गौरव करण्यात आला.

बॉक्स
यांनाही गौवरवण्यात
आले
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन तर्फे जगभरातील १०० देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅपेन हा उपक्रम सुरू आहे, ज्या अंतर्गत कोरोना काळात प्रभावी, आणि सर्वोउत्कृष्ठ, कारागिरी बजावणारे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान जागतिक स्थरावर केला जात आहे, यात मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री आदिती तटकरे, खा.डॉ.श्रिकांत शिंदे, खा.श्रीरंग बारणे, आ.निलेश लंके, आ.विनायक मेटे, आ.झिशान सिद्धिकी, मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

बॉक्स
हा सन्मान माझा एकट्याचा नसुन बीड शहराचा, बीड जिल्ह्याचा व त्याचबरोबर माझे आई-वडील, सर्व मित्रपरिवार व कुटुंबासह लॉकडाउन काळात मला मार्गदर्शन करणार्‍या प्रत्येकाचा आहे. सर्वांच्या शुभेच्छा व मार्गदर्शन कायम असावे.
मी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन च्या टिम चे यानिमित्त मन:पूर्वक आभार मानतो.असे शुभम धुत यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!