बीड

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दणक्याने सीओ गुट्टे शहर स्वच्छतेच्या लागले कामाला

काल कान पिळताच आज सकाळपासून स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ करतांना दिसून आले

बीड- कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्याने तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्व तयारीसाठी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली यावेळी शहरातील धूळ सह अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार नगर पालिका सीओ डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्यावर चांगलेच भिडले. आरे तू आधी डॉक्टर झाला पुन्हा एमपीएससी पास झाला. शहरात किती घाण आहे रे , तुला लाज कशी वाटत नाही. अशा शब्दात कान पिळत पुढच्या दौऱ्यात ही अशीच अस्वच्छता दिसली तर घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही असा दणका दिल्याने शनिवारी सकाळ पासून नगर पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करतांना दिसून आले असून उपमुख्यमंत्री यांच्या दणक्यात न.प. मुजोर कर्मचारी तळ्यावर आल्याचे दिसले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!