महाराष्ट्र राजकारण

मंत्री संजय राठोडला पत्नीची खंबीर साथ; पोहरादेवीकडे निघालेल्या ताफ्यात पत्नी शितलही सोबत

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) सकाळी पावणेअकरा वाजताच्या सुमारास पोहरादेवीला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीत ( MH 04 FB 567 ) बसून राठोड कुटुंबीयांसोबत निघाले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (Pooja Chavan) गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेल्या संजय राठोड यांची पहिली झलक प्रसारमाध्यमांनी टिपली, त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड होत्या. (Maharashtra Minister Sanjay Rathod leaves Poharadevi from Yawatmal with wife Sheetal Rathod)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले नव्हते. राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर, राठोड यांचे मेव्हणे सचिन नाईक आणि काही नातेवाईक राठोड यांच्या निवासस्थानी दाखल झाले. नेत्यांशी काही वेळ चर्चा केल्यानंतर ते पोहरादेवीकडे जायला निघाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!