महाराष्ट्र राजकारण

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीसाठी रवाना

गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोहरादेवी मंदिरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी केले बंद केले आहेत. बॅरिकेट लावून पोलिसांकडून रस्ते बंद केले आहेत. 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात केले आहेत. तसंच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

16 वाहनांचा ताफा

राठोड यांच्यासोबत 16 वाहनांचा ताफा आहे. त्यात राठोड यांची खासगी आणि सरकारी वाहन, नातेवाईकांच्या गाड्या, शिवसेना नेत्यांची वाहने, पोलिसांची वाहने आणि एस्कॉर्टच्या वाहनांचा समावेश आहे.

सोबत कोण?

राठोड यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोड, मेव्हणे सचिन नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह काही शिवसेना पदाधिकारी असल्याचं सांगण्यात येतं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!