Uncategorized

अवकाळीवर जिल्हाधिकाऱ्यानी घेतली अँक्शन, तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करा -रविन्द्र जगताप, तहसीलदारांना आजची आज अहवाल सादर करावा लागणार


बीड, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी अवकाळीवर अँक्शन घेतली आहे, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करा, असे आदेश त्यांनी सदर यंत्रणेला दिले आहेत, त्यानुसार तालुकास्तरावरील यंत्रनेला आजची आज अहवाल सादर करावा लागणार आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्हयात सर्वच ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, गारपिट आणि मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, पावसाचा जोर कालही दिवसभरही सुरूच होता. अवकाळी पावसाने सर्वच तालुक्यांना झोडपून काढले. यामुळे बहरलेल्या आंब्याचा मोहर उध्वस्त झाला. डाळिंब, पपई, द्राक्षे या फळबागांचे त्याचप्रमाणे ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांचेही प्रचंड मोठे नुकसान झाले. काढणीला आलेले हे पीक अक्षरशः भूईसपाट झाले. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने यामुळे हिरावून नेला आहे. अचानक आलेल्या या संकटाने शेतकरी पुर्णपणे कोलमडला आहे. सरकारने या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे तसेच आ. नमिता मुंदडा यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल जिल्हाधिकाऱ्यानी घेतली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!