Uncategorized बीड

वॉटर ग्रीडवर अजित पवारांनी चकार शब्द काढला नाही, भाजप आता शांत बसणार नाही – राम कुलकर्णी


बीड, दि. 15 : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवारी मराठवाडा विकास प्रश्नावर औरंगाबादला बैठक घेतली, त्या बैठकीत मराठवाडा वॉटर ग्रिड प्रश्नावर चकार शब्द काढला नसून योजना सरकारने गुंडाळी हे सिद्ध झाले, भाजपा या प्रश्नावर गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी दिली.
सोमवारी औरंगाबाद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक घेतली, यावेळी जिल्हा नियोजनच्या निधीला त्यांनी मंजूरी दिली, वास्तविक पाहता मराठवाड्याच्या राजधानीत येवूनही त्यांनी वॉटर ग्रीडसारख्या महत्वाच्या योजनेवर चकार शब्द सुध्दा काढला नाही, यावरूनच सरकारने ही योजना जवळपास गुंडाळल्याचे सिध्द होत आहे, असे असले तरी आता भाजप शांत बसणार नसल्याचाही इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!