बीड महाराष्ट्र

आज पुन्हा ‘त्या’ विहिरीत कोसळली कार; दोन ठार, दोन गंभीर जखमी

दोन दिवसांपूर्वीच  भरधाव कार विहिरीत पडल्याने बीड शहरातील दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. आज रविवारी पहाटे पुन्हा त्याच विहिरीत  भरधाव आय ट्वेन्टी कार कोसळल्याने दोघे ठार झाल्याची घटना जालना – चिखली रोडवर घडली. गाडीतील अन्य तिघे बचावले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मयत वाशीम जिल्ह्यातील असून त्यात एका महिलेसह लहान मुलीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. गाडी विहिरीबाहेर काढण्यात आली आहे.

दोन दिवसापूर्वीच या विहीरीत भरधाव कार पडल्याने बीड शहरातील शाहूनगर भागातील शेख मन्नान आणि अझहर कुरेशी या तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांनंतर आज पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!