बीड राजकारण

सत्य लपणार नाही, पण एखाद्याला आयुष्यातूनही उठवलं जाऊ नये, पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या घटनेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाला ट्विटरवर टॅग करण्यात आलं होतं. यावेळी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती. या विनंतीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी याबाबत दखल घेतली आहे.

अरुण राठोडचा पोलिसांचा शोध सुरु

अरुण राठोड या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पुण पोलिसांकडून सध्या अरुण राठोडचा शोध सुरु आहे. अरुण राठोड हा सध्या बीडमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप याची कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!