आष्टी

पाच हजाराची लाच घेताना अव्वल कारकुनाला पकडले, परवाना नूतनीकरणासाठी रेशन दुकानदाराकडून घेतली लाच


आष्टी, दि. 8 (लोकाशा न्यूज) : तालुक्यातील बेलगांव येथील रेशन दुकानदाराकडून परवाना नुतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना आष्टी तहसील मधील पुरवठा विभागाचा अव्वल कारकून अजिनाथ बांदल यास बीड येथील लाचलुचपत अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तहसिल कार्यालयाकडून दरवर्षी पुरवठा विभागाकडून सर्व रेशन दुकानदारांचे परवाने नुतनीकरण करण्यात येते. बेलगांव येथील स्वस्त धान्य दुकानदाराने आपल्या दुकानाचा परवाना नुतनीकरन करण्यासाठी आपल्याकडून पुरवठ्याचा अव्वल कारकुन अजिनाथ बांदल याने पैशाची मागणी केली असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्या दरम्यान आज दि.8 रोजी लाचलुचपतच्या अधिकार्‍यांनी तहसिल कार्यालयात सापळा लावून दुपारी पाचच्या दरम्यान अजिनाथ बांदल याला रंगेहाथ पकडले. या पथकात पोलिस उपाअधिक्षक बाळकृृृृृष्ण हानपुडे पाटील यांच्यासह पोलिस अंमलदार अमोल बागलाने,सखाराम घोलप, विजय बरकडे, चालक संतोष मोरे यांच्या पथकाने कारवाई केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!