देश विदेश

मध्यप्रदेश भाजपाची इंदौरला बैठक ; पंकजाताई मुंडे यांची उपस्थिती, स्थानिक निवडणूका, संघटनात्मक मजबुतीवर झाली चर्चा


इंदौर, दि. 31 : मध्यप्रदेश भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सह प्रभारी पंकजाताई मुंडे आज सकाळी इंदौर येथे आगमन झाले. विमानतळावर आमदार, खासदार व पदाधिकार्‍यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय बैठक देवगुराडिया स्थित क्रिसेंट रिक्रिएशन सेंटर येथे शनिवारपासून सुरू झाली. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे सकाळी इंदौरला पोहोचल्या. विमानतळावर इंदौरच्या माजी महापौर तथा आमदार मालिनी गौड़, खासदार शंकरलाल वाणी, सुदर्शन गुप्ता, जिला अध्यक्ष राजेश सोनकर, शहर उपाध्यक्ष नानूराम कुमावत, युवा मोर्चा सरचिटणीस मयूरेश पिंगळे आणि महिला मोर्चाने त्यांचे स्वागत केले. क्रिसेंट रिक्रिएशन सेंटर येथे पदाधिकार्‍यांच्या बैठकीस दिप प्रज्वलनाने सुरवात झाली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, प्रदेश प्रभारी मुरलीधर रावजी, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, विश्वेश्वरय्या जी, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत आगामी स्थानिक पालिका निवडणूकीची तयारी, उमेदवारांची निवड, मंत्री व कार्यकर्त्यांतील समन्वय तसेच संघटनात्मक बांधणी आदी विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ’मन की बात’ कार्यक्रम यावेळी दाखविण्यात आला.

पंकजाताईंनी घेतला इंदौरच्या प्रसिद्ध पोहयाचा आस्वाद !
विमानतळावरून बैठकीकडे जाताना रस्त्यात वाहनाचा ताफा थांबवून इंदौरच्या प्रसिद्ध पोहयाचा आस्वाद घेत घेत पंकजाताई मुंडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. ट्विट करून त्यांनी याचा विशेष उल्लेख केला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!