बीड

द कुटे ग्रुपच्या तिरूमला कोकोनट ऑईलचे बीडमधून कमर्शियल लॉन्चिंग


बीड, 24 : बीडमधील कुटे ग्रुपचे तिरुमला कोकोनट ऑईलचे शानदार समारोहात लॉचिंग करण्यात आले. श्री.ज्ञानोबाराव कुटे, राधाआई कुटे, सुरेश कुटे, अर्चना कुटे, आर्यन कुटे, डॉ. पद्माकरराव पाटोदेकर, आशाताई पाटोदेकर,यशंवत कुलकर्णी, आशिष पाटोदेकर, डॉ.जगदीश फुलझळके, आदींसह विविध माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते लॉचिंग करण्यात आलेले कोकोनट ऑईल आज पासून देशभरात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. कुटे ग्रुपचे संस्थापक सुरेशजी कुटे यांनी कोरोना लॉकडाऊनमुळे कोकोनट आईल लॉचिंग करण्यास उशीर झाला असं सांगत जो विश्वास तिरुमला खाद्य तेलावर देशभरातील ग्राहकांनी दाखवला. त्याच विश्वासास तिरुमला कोकोनट आईल पात्र राहिल असा विश्वास लॉचिंगच्या वेळी व्यक्त केला. यावेळी तिरुमला ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका अर्चनाजी कुटे यांनी बीडमध्ये लाँच झालेल्या कोकोनट हेअर ऑईल देशभरात नाही तर देशाबाहेरही विक्रीसाठी जाणार असल्याचं सांगितलं. तिरूमला कोकोनट देशातील 26 राज्यांमध्ये जाणार असून या माध्यमातून बीड जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोचणार आहे. तिरूमला खाद्यतेलाच्या अफाट लोकप्रिय ते नंतर तिरूमला कोकोनट ऑईलचे घरा घरात पोहोचणार असल्याचा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!