बीड केज

पुलावरून 30 फुट दरीत जीप कोसळली; केज तालुक्यातील विठ्ठल विद्यालयाचे शिक्षक ठार

बीड, दि.24 – औंढा नागनाथ वरून देवदर्शन करून नांदेड कडे आजारी नातेवाईकाला भेटण्यास निघालेल्या विठ्ठल विद्यालय सारणी सांगवी (ता.केज) शाळेवरील शिक्षकाच्या गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सारंग बळीराम काळे (रा.जीवाची वाडी ता.केज) असे मृत शिक्षकाचे नाव असून टायर फुटल्याने गाडी पूर्णा नदीवरून खाली पडल्याने सारंग काळे हे जखमी झाले होते. दरम्यान त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अन्य तिघेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदरील अपघात दि.24 रोजी सकाळी 10.30 वाजता झाला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!