देश विदेश

राज्यातील अकरा कारखान्यांना कोट्यवधींचा दंड !

मुंबई – विनापरवानगी गाळप हंगाम सुरू केल्यामुळे राज्यातील 11 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारवाई केली आहे. या सर्व कारखान्यांना मिळून 41.87 कोटी रुपयांचा दंड त्यांनी ठोठावला आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या साखर कारखान्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या कारखान्यांचा समावेश आहे.
शेजारच्या कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात राज्य सरकारने जाहीर केलेल्या तारखे अगोदर साखर कारखाने चालू करण्यास परवानगी दिली जात नाही. गाळप हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना अर्ज करून साखर आयुक्तांकडून गाळप परवाना घ्यावा लागतो, त्याशिवाय साखर कारखाने सुरू केल्यास कारखान्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागते.
विनापरवाना गाळप केलेल्या उसाला साखर आयुक्त प्रतिटन 500 रुपये दंड आकारणी करू शकतात.
कारवाई झालेले साखर कारखाने व कंसात दंडाची रक्कम रुपयांत

अथणी शुगर, शेवाळवाडी मोर्शी, ता. कराड, जि. सातारा (एक कोटी 42 लाख 85 हजार)तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर (दोन कोटी 47 लाख 83 हजार)

मातोश्री लक्ष्मी शुगर, दुधनी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर (63 लाख)

सिद्धी शुगर, उजना, ता. अहमदपूर, जि. लातूर (चार कोटी 54 लाख 45 हजार)

जय हिंद शुगर, आचेगाव, सोलापूर (चार कोटी 40 लाख 73 हजार 500)

छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे (सहा कोटी 33 लाख 44 हजार)

जरंडेश्वर शुगर, चिमणगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा (13 कोटी सात लाख 55 हजार)

कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना, महात्मा फुले नगर, ता. इंदापूर, जि. पुणे (चार कोटी 58 लाख 55 हजार)

नीरा भीमा साखर कारखाना, शहाजीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे (तीन कोटी 73 लाख 95 हजार)

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!