अंबाजोगाई

एसपींचा अवैध धंद्यावाल्याना मोठा दणका, अंबाजोगाईत राजा रामा स्वामींच्या पथकाने पत्त्याच्या क्लबवर मारला छापा; २७ जुगारी पकडले,7,57,200 नगदी रक्कमेसह 11 मोटर सायकली, 1 चारचाकी असा 18,59,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त


अंबाजोगाई, 21 जानेवारी : पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, त्यानुसार त्यांनी बुधवारी रात्री अंबाजोगाईतील अवैध धंद्यावाल्याना मोठा दणकाच दिला आहे, याठिकाणी त्यांच्या पथकाने एका पत्त्याच्या क्लबवर छापा मारला आहे; यावेळी २७ जुगाऱ्यांना पकडण्यात आले आहे, तर 7,57,200
नगदी रक्कमेसह 11 मोटर सायकली,1 चारचाकी असा एकूण 18,59,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, एका बाजूने या कारवाईमुळे एसपींबरोबरच त्यांच्या पथकाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे, तर दुसऱ्या बाजूने मात्र अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!