Uncategorized परळी

परळी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात, पंकजाताई मुंडेंनी केले सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन


परळी दि. 18 —— ग्रामपंचायत निवडणूकीच्या आज झालेल्या मतमोजणीनंतर परळी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या असून सर्व विजयी उमेदवारांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

परळी मतदारसंघातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन ग्रामपंचायती या अगोदरच बिनविरोध भाजपच्या ताब्यात आल्या होत्या. शुक्रवारी उर्वरीत पाच आणि अंबाजोगाई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीनंतर परळी तालुक्यातील भोपळा, लाडझरी आणि मोहा या ग्रामपंचायती भाजपकडे आल्या. मोहा येथे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावं पातळीवर आघाडी स्थापन करण्यात आली होती, त्याला मतदारांनी निर्विवाद कौल दिला. परळीतील पाच आणि अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर अशा सहा ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. आजच्या मतमोजणीनंतर भाजपला रेवली येथील आणखी एका जागेवर विजय मिळाला. लाडझरी येथे भाजपचेच दोन पॅनल होते, त्यापैकी एका पॅनलचा विजय झाला. या सर्व विजयी उमेदवारांचे पंकजाताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

विजयी झालेल्या उमेदवारांचे भाजपचे ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, वैद्यनाथ बँकेचे संचालक रमेश कराड, भीमराव मुंडे यांनी यशःश्री निवासस्थानी पुष्पहार घालून अभिनंदन केले

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!