बीड परळी

पोलिस कर्मचाऱ्याने परळीच्या रेल्वे उड्डाण पुलावरून मारली उडी; कारण अस्पष्ट

परळी वैजनाथ दि १८ ( लोकाशा न्यूज ) :- येथील संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सुनील सुंदरराव घोळवे बक्कल क्रमांक ७५५ यांनी सोमवार दि.18 जानेवारी संध्याकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारल्याची खळबळजनक घटना घडली. सदरची घटना समजताच संभाजीनगर पोलिस ठाणे आणि शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले.  सदर कर्मचाऱ्याने उडी कशामुळे मारली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्राप्त माहितीनुसार पोलीस कर्मचारी सूनील घोळवे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना परळीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!