बीड आष्टी

मेहेकरी फाट्याजवळ मिनी बस पलटी; 15 ते 20 वर्‍हाडी जखमी

कडा, दि.18 (लोकाशा न्युज)ः बीड-अहमदनगर या राज्य महामार्गावरील कड्यापासून जवळच असलेल्या मेहेकरी फाटा परिसरात रस्त्यावरच मिनीबस पलटून 15 ते 20 वर्‍हाडी जखमी झाल्याची घटना सोमवारी दि.18 जानेवारी रोजी रात्री 8.15 च्या दरम्यान घडली. अपघातातील जखमींना आष्टी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिनीबस (क्र.एम.एच 05 बी.के. 6125) हे एका लग्नासाठी वर्‍हाडीघेवून बीडवरुन कल्याणकडे जात होते. कड्याजवळील मेहेकरी फाट्याजवळ आले असता मिनीबस पुलाजवळ रस्त्यावरच पलटी झाली. या अपघातात बसमध्ये असलेले महिला, पुरूष, बालक असे अंदाजे 15 ते 20 वर्‍हाडी जखमी झाले आहेत. या जखमींना आष्टी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मिनीबस ऐन रस्त्यावरच पलटी झाल्याने या रस्त्यावरील ट्रॅफिक तब्बल 1 तास जाम झाली होती. यानंतर पोलिसांनी ट्रॅफिक सुरळीत केली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!