परळी दि. १० —— राजकारण व समाजकारणात काम करताना माणूस कितीही मोठया पदापर्यंत पोहोचला तरी सर्व सामान्य माणसांच्या सुख दुःखाशी तो किती समरस झालेला असतो किंबहूना त्याच्याशी त्याची नाळ कशी घट्ट असते याचा प्रत्यय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याबाबतीत आज आला. अंगरक्षकाच्या आईचे अपघाती निधन झाल्याची बातमी ऐकताच त्यांचे ह्रदय हळहळले. ” खूप वाईट झालं, किती मोठ्ठ दुःख लेकराला रे” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
गणेश खाडे रा. कांदेवाडी हे सध्या पंकजाताई मुंडे यांचे शासकीय अंगरक्षक आहेत. तालुक्यातील कौडगाव साबळा हे त्यांचे आजोळ आहे, त्यांची आई सुलोचना खाडे काही दिवसासाठी माहेरी आल्या होत्या. आज सकाळी गणेश खाडे हे आपल्या आईला मोटारसायकल वरून गावी घेऊन जात असताना नाथरा पाटीजवळ गाडी स्लीप होऊन अपघात झाला. या अपघातात आई सुलोचना यांचा जागीच मृत्यू झाला तर ते जखमी झाले.
अपघाताची बातमी कळताच पंकजाताई यांनी फोन करून खाडे कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली व सुलोचना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “माझ्या बॉडीगार्ड गणेशची आई वारली…खूप वाईट झालं … किती मोठ्ठ दुःख लेकराला रे, वडीलही नाहीत ” अशा शब्दांत फेसबुक पोस्टवरून हळहळ व्यक्त केली. सर्व सामान्य माणसांविषयी त्यांच्यात असलेल्या संवेदनशील मनाचे दर्शन यावेळी झाले.
••••