बीड

आ. संदीप क्षीरसागरांची आक्रमकता बीड मतदार संघाच्या विकासात मोठी भर घालणार! रखडलेली भुयारी गटार अन अमृत पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी उतरणार रस्त्यावर; प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीही सोडवणार

बीड :- बीड नगर परिषदे अंतर्गत शहरातील अमृत अभियांनाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली व अर्धवट अवस्थेतील भुयारी गटार व अमृत पाणी पुरवठा योजना तातडीने पुर्ण करा, शहरातील जनतेचे हित पाहता या दोन्ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती मदत करू परंतू या दोन्ही योजना अनेक वर्षापासून रखडत ठेवून शहरातील जनतेला त्रास देणार्‍या व कामात दिरंगाई करणार्‍या कंत्राटदारासह दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. भुयारी गटार व अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी प्रत्यक्ष कामाच्या साईटवर जावून जेथे प्रशासनाला अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सदैव आम्ही रस्त्यावर आहोत या दोन्ही योजनेचे काम अधिक गतीने करण्यात यावे, शहरातील नागरिकांना रखडलेल्या कामांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला असून यापुढे शहरातील होणारी विकास कामे गुणवत्ता व दर्जेदार करून घेण्यासाठी रस्त्यावर उभा राहून काम करून घेवू प्रशासनाला येणार्‍या तांत्रिक अडचणी दुर करत शहराचा विकास अधिक गतीने करू असे प्रतिपादन बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांनी केले आहे. 

मंगळवार दि.22 डिसेंबर रोजी बीड शहरातील अमृत अभियानांतर्गत भुयारी गटार व पाणी पुरवठा योजना रखडलेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विशेष सहाय्य तथा पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय येथे अधिकार्‍यासह, नगर पालिका, जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीसाठी आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अमृत अभियांनातर्गत भुयारी गटार व पाणी पुरवठा योजनेचा लेखाजोखा मांडल्यानंतर अनेक गंभीर बाबी समोर आल्या. शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदून टाकले त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात होवून दोन नागरिकांचा निष्पाप बळी गेलेला आहे. शहराच्या विकासासाठी पुन्हा-पुन्हा निधी येत नसल्याने आलेला निधी विकास कामावर योग्य पद्धतीने खर्च झाला पाहिजे, कामाची गुणवत्ता टिकली पाहिजे यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. येथील सत्ताधार्‍यांनी जाणीवपुर्वक सदरील दोन्ही योजनांची कामे रखडत ठेवली आहे. परंतू शहरासाठी महत्त्वाची असलेल्या या दोन्ही पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. ज्यांच्यामुळे या योजना रखडल्या, ज्यांनी दिरंगाई केली, ज्यांच्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेले त्यांच्यावर कार्यवाही करावी असे सांगत सदरील दोन्ही योजनांचे काम तातडीने पुर्ण करा असे निर्देश यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. या योजनेसाठी प्रत्यक्ष कामाच्या साईटवर जावून अडचणी असेल तेथे मी स्वत: उपस्थित राहून अडचणी दुर करून ही योजना पुर्णत्वास नेण्याची जबाबदारी घेतो अशी भूमिका आ.संदिप क्षीरसागर यांनी घेतल्यानंतर नगर परिषदेतील अधिकारी, जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांनी आ.संदिप क्षीरसागर यांचे आभार मानत सदरील दोन्ही योजना तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.

बीड शहरातील 12 कि.मी.रस्त्यासह बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा

बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातून धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरील बीड बायपास रस्त्याला सर्व्हिस रोड व स्लीप रोड नसल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना, नागरिकांना मोठा त्रास होत असून तातडीने सर्व्हिस रोड तसेच स्लीप रोड करण्यात यावा अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल हायवेच्या आढावा बैठकीत केली. यावर बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत 12 कि.मी. रस्त्यासह बीड बायपासला सर्व्हिस व स्लीप रोडचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. आ.संदिप क्षीरसागर यांच्या विनंतीवरून राष्ट्रीय महामार्ग 52 च्या अधिकार्‍यांची आढावा बैठक पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. या बैठकीला माजी आ.सय्यद सलीम, सुनिल धांडे यांची विशेष उपस्थिती होती.
बीड शहरातून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.52 (जुना 211) जातो. या रस्त्याला बायपास झाला असल्याने शहरातील मुळ रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष झाले असून रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली असल्याने याचा शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्या बरोबर या महामार्गावर झालेल्या बीड बायपासला सर्व्हिस रोड व स्लीप रोड नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या बाबत आ.संदिप क्षीरसागर यांच्या विनंतीवरून मंगळवार दि.22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग क्र.52 च्या कामा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे, प्रोजेक्ट डायरेक्टर गाडेकर, आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्यासह आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्यासह बायपासला सर्व्हिस रोड व स्लीप रोड बाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी पोटतिडकीने मुद्दा मांडत सदरील प्रश्‍न तातडीने मार्गी लागावा अशी विनंती केली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील 12 कि.मी.रस्त्यासह बीड बायपास, सर्व्हिस रोड व स्लीप रोडचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावा असे निर्देश दिले आहे.


आ.संदिप क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा

बीड शहरातून धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.52 (जुना 211) जातो. या रस्त्यावर बायपास झाल्याने मुळ शहरातील 12 कि.मी.च्या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष झाल्याने व बीड बायपासला सर्व्हिस रोड व स्लीप रोड नसल्याने नागरिकांना होणार्‍या त्रासाबद्दल तसेच सदर प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आ.संदिप क्षीरसागर यांचा सातत्याने पाठ पुरावा सुरू आहे. त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून खा.शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे, जलसंपदा मंत्री जयंती पाटील तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे. आजच्या या आढावा बैठकीने सद्य स्थितीत सुरू असलेले काम व प्रस्तावित काम तसेच नव्याने करावयाच्या कामाबाबत चर्चा झाल्याने यात अनेक बदल करून सदरील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आ.संदिप क्षीरसागर प्रयत्नशील राहतील असे दिसून येते. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!