बीड

दहा कोटी नागरिकांच्या अस्मितेच्या प्रश्‍नावर खा. प्रीतमताईंनी आवाज उठविला ! ‘गोरीबोली’ला राज्य भाषेचा दर्जा देण्याची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली मागणी


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : गोर बंजारा समाजाच्या गोरीबोली (बंजारा भाषा) भाषेला राज्य भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी एका पत्राव्दारे खा. प्रीतमताई मुंडेंनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. खा. प्रीतमताईंच्या या मागणीला नक्कीच यश मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
गोर बंजारा समाजातील दहा कोटी नागरिक गोरबोली भाषा बोलतात,   महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, उत्तर प्रदेश, राज्यस्थान, मध्यप्रदेशसह अन्य राज्यात वास्तव्यास असलेले बंजारा, लम्माणी, लांभाणी, लंबाडी, बाजीगर समाजातील नागरिक ही भाषा बोलतात, या भाषेला ऐतिहासिक महत्व आहे.  त्यामुळे ही भाषा भविष्यातही टिकून राहणे अत्यंत आवश्यक आहे. असे असतानाही या भाषेला आतापर्यंत संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला नाही, या भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी मागच्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. जिवनात भाषेला मोठे महत्व आहे. कारण भाषेसोबतच समाजाच्या भावना जुडलेल्या असतात, विशेष म्हणजे सामाजिक विकासातही भाषेला महत्वपुर्ण योगदान असते. हे लक्षात घेवूनच तुम्ही तुमच्या नेतृत्वात लवकरच गोरीबोली भाषेला (बंजारा भाषा) राज्य भाषेचा दर्जा मिळवून देताल, असा विश्‍वास खा. प्रीतमताईंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!