बीड

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकताच पणन महासंघाने नवे आकरा खरेदी केंद्र सुरू केले, 16 ग्रेडरची नियुक्ती तर कापूस नोंदणीसाठी चार जानेवारीपर्यंत मुदतही वाढविली



बीड, 22 डिसेंबर : बीड जिल्ह्यात कापूस खरेदी हंगाम सन 2020-21 मध्ये शासकीय हमी भावानुसार कापूस खरेदी सीसीआय व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ यांचे मार्फत चालू आहे. बीड तालुक्यामध्ये सीसीआयची 11 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर, गेवराई येथील 7 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर व वडवणी येथील 2 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू आहे. या तीन तालुक्यात दि. 21 डिसेंबर, 2020 अखेर एकूण 2,43,5 9 4 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत माजलगाव तालुक्यात 4 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर, परळी तालुक्यात 1 जिनिंगवर, केज तालुक्यात 4, धारुर तालुक्यात 6 अशी एकूण 15 जिनिंग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदी चालू असून दि. 21 डिसेंबर , 2020 अखेर या चार तालुक्यात एकूण 2,64.071 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये व्यापार्‍यांकडून 1,42,177 क्विंटल कापूस खरेदी झालेली असून जिल्ह्यामध्ये सीसीआय, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व खाजगी खरेदी अशी एकूण 6,4 9 , 842 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाची परळी तालुक्यात 4, माजलगाव तालुक्यात 5, केज तालुक्यात 1 व आष्टी तालुक्यात 1 अशा एकूण 11 कापूस खरेदी केंद्रांना नव्याने मंजुरी मिळालेली आहे. सदर नव्याने सुरू होणार्‍या 11 कापूस खरेदी केंद्रांवर  जिल्हाधिकारी , बीड यांचे दि . 21 डिसेंबर , 2020 रोजीचे आदेशान्वये 16 ग्रेडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये दि. 1 9 डिसेंबर, 2020 अखेर 66746 शेतकर्‍यांनी त्यांचा कापूस शासकीय हमीभावानुसार विक्री करण्यासाठी संबंधित बाजार समित्यांकडे आवश्यक कागदपत्रासह नोंदणी केली आहे; परंतु जिल्ह्यातील बर्‍याच कापूस उत्पादक शेतकन्यांकडून व लोकप्रतिनिधींकडून कापूस नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. सबब जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकन्यांना त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद करण्याची मुदत दि. 04 जानेवारी , 2021 अखेर वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यातील ज्या कापूस उत्पादक शेतकन्यांनी अद्याप बाजार समितीकडे नोंद केलेली नाही, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या वाढीव कालावधीत त्यांचेकडील विक्रीयोग्य कापसाची आपल्या तालुक्याचे बाजार समितीमध्ये आवश्यक त्या कागदपत्रासह नोंद करावी, ज्या शेतकर्‍यांनी अद्याप त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंद बाजार समितीकडे केलेली नाही , अशा सर्व शेतकन्यांनी दि . 04 जानेवारी , 2021 पर्यंत त्यांचा पासपोर्ट साईझचा फोटो , आधार कार्ड , जनधन खाते वगळून इतर राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत , कापूस पिकाची नोंद असलेल्या गाव नमुना क्र . 7/12 ची प्रत आणि तलाठी यांचे स्वाक्षरी व शिक्क्यासह कापूस पीक पेरा प्रमाणपत्र यासह आपल्या बाजार समितीकडे नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!