बीड

केज- बीड रोडवर भीषण अपघात तिघे ठार

केज :
केज बीड रोडवरील नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर कार व मोटारसायकल मध्ये भीषण अपघात झाला असून यात तिघे ठार झाल्याची माहिती आहे.
केज बीड रोडवर मंगळवारी (दि.२२) दुपारी तीन च्या दरम्यान कार व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातात तिघे ठार झाल्याचे वृत्त आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला ? हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मयत हे अप्पाराव बापूराव ढाकणे वय 80, सुंदर नामदेव ढाकणे वय 53, बहादूर राजाभाऊ पुरी वय 48 रा. सारुळ येथील असल्याची माहिती मिळत आहे. सदरील जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघा जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला पाठवण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली. मात्र अंबाजोगाई ला पाठवण्यात आलेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!