देश विदेश

बीड जिल्ह्यातील रस्त्यांच्या समस्या सोडवणार, थोडाही विलंब न करता निधी उपलब्ध करून देणार,खा.प्रीतमताईंना नितीन गडकरींनी दिले आश्वासन


दिल्ली, खा. प्रीतमताई मुंडे याांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज त्यांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी भेट घेतली.बीड जिल्ह्यातील विविध रस्ते आणि बीड येथील बिंदुसरा नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

बीड शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची नितांत आवश्यकता आहे.यासंदर्भात मा.मंत्री महोदयांशी चर्चा करून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी केली.तसेच शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे आणि बिंदुसरा नदीवरील पुलाचे चौपदरीकरण करून रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील केली.

मा.मंत्री नितीनजी गडकरी यांनी प्रीतमताई मुंडे याांनामागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना याबाबतीत विना विलंब शक्य तेवढा निधी उपलब्ध करून देऊ आणि बीड जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!