मराठवाडा

पहिल्या फेरीचा निकाल घोषित, आ. सतीश चव्हाणांची 17,372 मतांची आघाडी, पोकळे दुसऱ्या तर बोराळकर तिसऱ्या क्रमांकावर

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीची पहिली फेरी सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाली. या जाहीर केलेल्या फेरीनुसार विद्यमान आमतदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी 17 हजार 372 मतांची आघाडी घेतली. यात भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10,973 तर सतीश चव्हाण यांना तब्बल 27,879 मते मिळाली. पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीने पहिल्या पसंतीक्रमात तब्बल 17,372 मतांची आघाडी घेतली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला गुरूवारी सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली. सुरूवातीला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या मतपेट्या खोलून सर्व बॅलेट पेपर एकत्र करण्यात आले. नंतर त्यांचे मतमोजणीच्या 56 टेबलवर गठ्ठे लावण्यास सुरूवात झाली. 25 बॅलेटपेपरचे एक बंडल याप्रमाणे हजार मतांचा एक गठ्ठा तयार करण्यात आला. हजार-हजार बॅलेटपेपरचे पाच फेर्‍यांचे गठ्ठे 56 मतमोजणी टेबलवर लावण्यात आले. या सर्व प्रक्रियेत दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ गेला. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता पहिल्या फे रीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. दरम्यान, पोस्टल मतांचीही मोजणी सुरू करण्यात आली. एकूण 1248 पोस्टल मतांतून 175 मते बाद झाली. त्यानुसार 1073 पोस्टल मतांची मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या फेरीचा निकाला सायंकाळी जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीतील 56 हजार मतांपैकी 50 टक्के मतांच्या मोजणीपर्यंत एकूण 35 उमेदवारांपैकी 30 उमेदवारा शून्यावरच होते. तर पाच उमेदवारांपैकी विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर, त्यापाठोपाठ रमेश पोकळे, तिसर्‍या क्रमांकावर भाजपचे शिरीष बोराळकर होते. तर प्रहारचे सचिन ढवळे, प्रा. नागोराव पांचाळ यांनीही मते घेतली. सायकाळी साडेसहा वाजता पहिल्या फे रीच्या निकाल घोषित करण्यात आला. त्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी 17 हजार 372 मतांची आघाडी घेतली. यात भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10,973 तर सतीश चव्हाण यांना तब्बल 27,879 मते मिळाली. पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीने पहिल्या पसंतीक्रमात तब्बल 17,372 मतांची आघाडी घेतल्याने सतीश चव्हाण यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

मतमोजणी केंद्रावर नो सोशल डिस्टन्सिंग :कलाग्रामच्या मतमोजणी केंद्रावर विविध 35 उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सकाळीच धडकले होते. त्यामुळे सकाळपासूनच येथे कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ पहायला मिळाली. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येकाला थर्मलगने तपासून, सॅनिटायझर लावून आत सोडले जात होते. मात्र मध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्ला उडालेला दिसून आला. मोजणीच्या प्रत्यक्षस्थळी मोबाइल बंदी असतानाही अनेकांच्या हातात मोबाइल दिसून आल्याने वंचित बहुजन आघाडीने यावर आक्षेप घेत विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सकाळच्या सत्रातच तक्रार केली. केंद्रेकर यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले. मात्र पुढे काही कारवाई झालेली दिसून आली नाही.

पोस्टल मतांत चव्हाणांनी 314 मतांची आघाडी : पोस्टल मतदानात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी वैध ठरलेल्या 1048 पैकी 600 मते घेत भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्याविरोधात 314 मतांची आघाडी घेतली. बोराळकर यांना 286 मते मिळाली. एकूण 1248 मतांपैकी 175 मते बाद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!