औरंगाबाद: औरंगाबाद पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निडवडणुकीची पहिली फेरी पूर्ण झाली आहेत. पहिल्या फेरीत एकूण ५६ हजार मतांची मोजणी झाली आहे. यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना २५ हजार मते मिळाली आहेत. तर इतर मतांची विभागणी भाजपचे शिरीष बोराळकर आणि अपक्ष सिद्धेश्वर मुंडे आणि रमेश पोकळे यांच्यात झाली आहे. पहिल्या फेरीत ५ हजार ५०० मते अवैध ठरली आहेत. यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहे, अशी माहिती सुञांनी दिली. तसेच या निवडणूकीचा निकाल येण्यास रात्री उशीर होणार असल्याचेही सुत्रांकडून कळते.
या निवडणुकीत झालेल्या २ लाख ४० हजार ७९६ मतांपैकी वैध मते आणि अवैध मते ठरवल्यानंतरच विजयासाठीचा कोटा ठरवण्यात येणार आहे. माञ, अद्याप कोटा न ठरवता मतमोजणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात तब्बल ३५ उमेदवार आहेत. यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ”कांटे की टक्कर” पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत एकूण १ हजार २४८ पोस्टल मतदान झाले. त्यापैकी १७५ मते अवैध ठरली आहेत. यांपैकी ६०० मते सतिश चव्हाण यांना मिळाली असून शिरीष बोराळकर यांना केवळ 286 मते मिळाली. यात सतीश चव्हाण 314 मतांनी आघाडी घेतली आहे.