बीड

सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या सेवेमुळे जिल्ह्यातील गोरगरिब रूग्णांना न्याय मिळाला, बीड जिल्हा शल्यचिकीत्सकाची धुरा आता डॉ. सुर्यकांत गित्तेंकडे


बीड, दि. 26 नोव्हेंबर : तीन वर्षे तीन महिन्याची रुग्ण सेवा, आरोग्य कर्मचार्‍यांचे सुकानुधारी संचलन, लोकांची काळजी वाहणारा वाहक आणि सामाजिक उपक्रमाचे मार्गदर्शक सिद्ध झालेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचा पदभार गुरूवारी डॉ. गीत्ते यांना जाहीर झाला. डॉ. थोरात यांची उपसंचालक म्हणून बढती होणार असून त्यांचे प्रमोशन सामान्य लोकांना आनंद देणारे असले तरी त्यांची उणीव मात्र भावनिक आणि सदगतीत करणारी आहे. रुग्णसेवा तरतरीत करताना सामाजिक पातळीवर अनेक यंत्र सामुग्री उभा करून लोकांना अत्यंत प्रभावी सेवा तीही सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून देणारे डॉ. अशोक थोरात यांना कायम आठवणीत ठेवले जाईल. लोकविश्वास कमावताना जिल्हा यंत्रणेचे नेतृत्व आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे कोरोना काळात प्रभावी सहकारी म्हणून ते सिद्ध झालेले आहेत.
येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना शासनाकडून बढती मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून त्यांच्या ठिकाणी डॉ.सुर्यकांत गिते यांची गुरुवारी (दि.26) नियुक्ती केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, बीड जिल्ह्यातील पाटोदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुर्यकांत रामचंद्र गिते यांची बीडचे नवे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अवर सचिव व्ही.पी.घोडके यांच्या स्वाक्षरीने आदेश पारित करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ.अशोक थोरात यांनी तीन वर्षात तोकडे मनुष्यबळ, सुविधांचा अभाव असतानाही अत्यंत उत्कृष्टरित्या काम केले. कोरोना काळात त्यांनी उत्तमरित्या परिस्थिती हाताळली. त्यांची हा कार्यकाळ जिल्ह्यातला कोणीही विसरू शकणार नाही.

याच संदेशाने अनेकांचा हुंदका मिळवला  
गेली तीन वर्ष तीन महिने व कोरोनाच्या कठीण काळात स्वत:च्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य. या कालावधीत आरोग्य विभागात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवता आले. या संपूर्ण प्रवासात आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार, जेथे कमी पडलो त्यास्तव क्षमस्व, धन्यवाद.!! हा संदेश डॉ. अशोक थोरात यांनी पाठवला आणि अनेकांच्या आठवणीतले डॉक्टर उजळून निघाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!