देश विदेश

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा विराजमान होणार का? आज मतदान


अमेरिका, दि. 3 : अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. या निवडणुकांमध्ये जो बायडेन यांचं पारडं जड असल्याचंही म्हटलं जात आहे. जर असं झालं तर १९९२ नंतर प्रथमच राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडणूक जिंकणार नाहीत.
१९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा पराभव केला होता. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर ट्रम्प वेळेपूर्वी विजय घोषित करतील अशा चर्चांना अमेरिकेतील राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. परंतु ट्रम्प यांनी या वृत्ताचं खंडन केलं. “आपण असं काहीही करणार नाही.” असं ते म्हणाले. परंतु निवडणुका झाल्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे संकेत मात्र ट्रम्प यांनी दिले. निवडणुकीच्या रात्री वेळेपूर्वीच विजयाची घोषणा केली जाईल का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. “निवडणुकीनंतर मतपत्रिका गोळा करणं हे खूप धोकादायक आहे. मला असं वाटते की निवडणुका संपल्यानंतर लोकांना किंवा राज्यांना बऱ्याच काळासाठी मतपत्रिका सादर करण्याची परवानगी दिली जाते. तेव्हा ते धोकादायक आहे. कारण ती फक्त एक गोष्ट करू शकते,” असंही ट्रम्प यांनी उत्तर देताना सांगितलं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!