बीड

डीसीसीचे अध्यक्ष आदित्य सारडांना उच्च न्यायालयाचा दिलासा, सहकार मंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती, विरोधक पडले तोंडघशी


बीड, दि. 28 ऑक्टोबर : राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई कधीही यशस्वी होत नाही, असाच काहीसा प्रकार बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या बाबतीत घडला होता, तक्रारीत काहीही तथ्य नसतानाही त्यांच्यावर लातूरच्या विभागीय सहनिबंधकांनी आपात्रेतीची कारवाई केली होती, तर विभागीय सहनिबधकांचा हा निर्णय सहकार मंत्र्यांनी कायम ठेवला होता, या निर्णयाच्या विरोधात आदित्य सारडा यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती, त्यानुसार उच्च न्यायालयाने सहकार मंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती देऊन
आदित्य सारडा यांना मोठा दिलासा दिला आहे, त्यामुळे आदित्य सारडा यांचे डीसीसीचे अध्यक्ष पद कायम राहिले असून सारडा यांच्या विरोधात षडयंत्र रचणारे विरोधक मात्र तोंडघशी पडले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!