बीड

बीडची एक स्कॉर्पिओ शस्त्रासह पोलिसांनी पकडली, तीन पिस्टलसह 13 राऊंड जप्त; बीडचे पाच तरूण ताब्यात


बीड, दि. 27 ऑक्टो- औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री हद्दीत एका स्कॉर्पिओसह तीन पिस्टल, तेरा राऊंड जप्त करून पोलिसांनी बीड जिल्ह्यातील पाच तरूणांना ताब्यात घेतले. आज पहाटे फुलंब्री पोलिसांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
पिस्टल विक्रीसाठी काही इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पहाटे पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ क्र.एम.एच.23 एस.4747 येतांना दिसली. पोलिसांनी तपासली असता त्यामध्ये शरद सुरेश पुरी, नितीन दत्तात्रय जाधव, संतोष ओंकार गायकवाड, मच्छिंद्र ज्ञानदेव सानप (सर्व रा.गेवराई जि.बीड) आणि राहुल पुंडलीक बुधनर (रा.खामगाव ता.बीड) यांच्याकडे तीन पिस्टल, तेरा राऊंड आढळुन आले. पोलिसांनी एकुण 7 लाख 35 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन या प्रकरणातील आरोपी गंभीर गुन्ह्यातील असल्याचे सुत्रांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!