महाराष्ट्र

कसा असेल शिवसेनाचा दसरा मेळावा, संजय राऊतांनी दिली माहिती

मुंबई, दि.25 (लोकाशा न्यूज) : २०१९ चा दसरा मेळावा आमच्यासाठी महत्वाचा होता. मागच्या दसऱ्या मेळाव्याला बोलत होतो. मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार. त्यामुळे आजचा दसऱ्या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर शिवतिर्थाच्या बाजूला असलेल्या वीर सावरकर सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या दसऱ्या मेळाव्याला मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री भाजपाला टार्गेट करणार का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, करोना नसता तर शिवतिर्थ अपुरं पडलं असतं. दसऱ्या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी केली आहे. पण टार्गेट करणारं राजकारण शिवसेना कधीच करत नाही. उद्धव ठाकरे काय बोलतील हे तुम्हाला संध्याकाळी समजेलच.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!