महाराष्ट्र

आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’, पंकजाताईंनी व्यक्त केला संताप


मुंबई, दि. 26 (लोकाशा न्यूज) : कोरोनाचे संकट लक्षात घेवून पंकजाताईंनी यावर्षी सावरगाव इथल्या दसरा मेळाव्यानिमित्त भगवान भक्ती गडावरावरून ऑनलाईन मार्गदर्शन केले. मात्र याठिकाणी गर्दी जमविल्याप्रकरणी त्यांच्यासह 40 ते पन्नास जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, यावर पंकजाताईंनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, परवानगी घेऊन गेले असतानाही गुन्हा दाखल झाला आहे. आधी माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आता तेच सत्र माझ्यापर्यंत आलं आहे,असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या, मी अतिवृष्टीची पाहणी केली, शेतकर्‍यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौर्‍यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसर्‍याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असतां गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!