बीड

आज 193 रूग्ण कोरोनामुक्त होणार


बीड, दि. 2 ऑक्टोबर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी यातून मुक्त होणार्‍या रूग्णांचा आकडाही खूप मोठा आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातून 193 जण कोरोनामुक्त होणार आहेत. यामध्ये बीड 37, आष्टी 26, पाटोदा 10, शिरूर 8, गेवराई 13, माजलगाव 9, वडवणी 9, धारूर 8, केज 15, अंबाजोगाई 27 आणि परळीतील 31 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 10236 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यापैकी 7701 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 294 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सध्या 2241 रूग्ण उपचार घेत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!