बीड

तहसिलदारांमध्येही फेरबदल, श्रीकांत निळे, सचिन खाडे, वैभव महिंद्रकर, प्रतिभा गोरे, विपीन पाटील यांची झाली बदली, आता आष्टी राजाभाऊ कदमांकडे तर माजलगाव तहसिलदार पदी वैशाली पाटील रूजू होणार


बीड, दि. 2 ऑक्टोबर : पोलिस प्रशासनापाठोपाठच महसूल प्रशासनातल्या अधिकार्‍यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. बीडचे तहसिलदार श्रीकांत निळे यांची पाथरी येथे तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. येथील सहाय्यक पुरवठा अधिकारी सचिन खांडे यांची गेवराई तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेवराईचे तहसिलदार धोडींबा गायकवाड यांची हिमायतनगर (जि.हिंगोली) याठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. आष्टीचे तहसिलदार वैभव महिंद्रकर यांची जालना येथे सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी औरंगाबाद आयुक्त कार्यालयात नगर पालिका प्रशासनाच्या तहसिलदार पदी कर्तव्य बजावणारे राजाभाऊ कदम यांची बदली करण्यात आली आहे. कदम यांनी यापुर्वी धारूर या ठिकाणी सलग तीन वर्ष अत्यंत चांगल्या पध्दतीने कर्तव्य बजावले होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आष्टीला एक चांगला तहसिलदार मिळाला आहे. तसेच माजलगावच्या तहसिलदार प्रतिभा गोरे यांची पालम याठिकाणी तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नांदेड याठिकाणी संजय गांधी योजनेचा कारभार संभाळणार्‍या वैशाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परळीचे तहसिलदार विपीन पाटील यांची अंबाजोगाई तहसिलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिरूरच्या तहसिलदार पदी भूम याठिकाणी कर्तव्य बजावणारे उषाकिरण संग्राम श्रृंगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!