बीड

आता महसूल विभागातही मोठे फेरबदल, शोभदेवी जाधव, नम्रता चाटे, श्रीकांत गायकवाड यांच्या झाल्या बदल्या, बीडला आरडीसी म्हणून संतोष राऊत येणार

अंबाजोगाई उप विभागीय अधिकाऱ्याची जबाबदारी आता शरद झाडगे यांच्याकडे


बीड, 2 ऑक्टोबर : पोलीस प्रशासनाच्या पाठोपाठच आता महसूल विभागातही मोठे फेरबदल (उप जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या) झाले आहेत, अंबाजोगाईच्या उप विभागीय अधिकारी शोभादेवी जाधव यांची लातूर याठिकाणी पुनर्वसनाच्या उप जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे, मंदार वैद्य नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते, त्यांची औरंगाबाद याठिकाणी रोहयोच्या उप जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे, या ठिकाणी बीडच्या वर्षाराणी भोसले ह्या कर्तव्य बजावत होत्या, त्यांची औरंगाबाद येथेच विशेष भूसंपादन पदावर बदली करण्यात आली आहे, तसेच पाटोद्याच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांची परळी याठिकाणी गणेश महाडिक यांच्या जागी उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तसेच यापूर्वी बीड जिल्ह्यात पुरवठा अधिकारी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पडणारे संतोष राऊत यांची बीडच्या आरडीसी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, ते सद्या लातूर याठिकाणी उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होते, तसेच अंबाजोगाई या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून शरद झाडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ते सद्या बिलोली याठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते, बीड रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांची माजलगाव याठिकाणी शोभा ठाकूर यांच्या जागी उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे, तसेच अहमदपूर याठिकाणी उपविभागीय अधिकारी असणारे प्रभोदय मुळे यांची कंधार याठिकाणी बदली करण्यात आली आहे, याठिकानीही त्याकडे उपविभागीय अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!