बीड

माजलगाव तालुक्यात युवकाची गळफास घेवून आत्महत्या


माजलगाव, 1 ऑक्टोबर : माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील मकरंद रघुत्तम जाहगीरदार (43) या आजारी अविवाहीत युवकाने गुरुवारी पहाटे स्वतःचे घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
किट्टीआडगाव येथील मकरंद या युवकाचे बी.एड.चे शिक्षण पुर्ण झालेले होते.माञ काही दिवसापुर्वी त्याला नैराश्य आल्याने त्याचावर उपचार सुरु होते.तो नेहमी प्रमाणे बुधवारी राञी त्याच्या खोलीत राञी झोपला होता.तो गुरुवारी सकाळी न उठल्याने त्याचे कूटूम्बीय त्यास उठवण्यास गेले असता.मकरंद याने माळवदाच्या कडीला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.याबाबत नागरीकांनी माजलगाव ग्रामीण पोलीसांना खबर दिली.पोलीसांनी पंचनामा करुन शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले असून पुढील तपास पो.जमादार अतिष देशमुख हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!