बीड

जिल्ह्याला मोठा दिलासा; सिव्हिल स्वत:च तयार करणार आक्सिजन

जिल्हाचा ऑक्सिजन तुटवडा कमी होणार, प्लांटचे डॉ. थोरातांच्या हस्ते उद्घाटन

बीड, दि.02 (लोकाशा न्यूज)ः वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने जिल्हा रुग्णालय बीड यांनी स्वत:च ऑक्सिजन तयार करण्याचे प्लांट उभा करत आज शुक्रवार दि. 02 ऑक्टोबर रोजी जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अशोक थोरात यांच्याहस्ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे भासत असलेल्या ऑक्सिजन तुटवडा कमी होणार आहे.
यावेळी डॉ. अशोक हुबेकर, डॉ. मंडलेचा, आदीनाथ मुडे, शेख रियाज, देशपांडे, औरसमल, सोनटक्के यांची उपस्थिती होती. दिवसेंदिवस ऑक्सिजन नसल्याने आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांची परिस्थीती गंभीर होती होती. काहींना तर जिवही गमवावला. यामुळे जिल्हा रुग्णालय यांनी 6 लाख लिटर ऑक्सिजन तयार करणार इयर होक्स कंपनीचे प्लांट घेत जिल्हा रुग्णालयात उभा केले. उभा केलेल्या  प्लांटमधून 24 तासात 88 सिलेंडर तयार करण्याची शमता असल्याने भासत असलेला तुटवडा कमी होणार असल्याने जिल्ह्यासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी आहे. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!