देश विदेश

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण, पत्नी मेलेनियाही कोरोनाबाधित

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्विट करत आपल्या सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं होतं.

तसंच आपण क्वारंटाईन होत असल्याची माहिती दिली होती. ‘अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. फर्स्ट लेडी आणि मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,’ असं त्यांनी म्हटलं होतं.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1311859538279239686

मास्क घालायचं टाळायचे ट्रम्प 
कोरोनाचा फैलाव ज्यावेळी सुरु झाला होता त्यावेळी ट्रम्प अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालत नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की मास्कची मला गरज वाटत नाही. मात्र नंतर त्यांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली होती.

अमेरिकेत स्थिती गंभीर 
चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही आजघडीला अमेरिकेत आहे. तसेच कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. आजघडीला अमेरिकेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7,494,671 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 212,660 जणांना जीव गमावावा लागला आहे. तर 4,736,621 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 2,545,390 इतके आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!