मराठवाडा

लाच घेण्यामुळे खाकीची प्रतिमा डागाळली, वाळूच्या वाहतूकीसाठी पावणे पाच लाख मागणार्‍या बनसोडे प्रकरणाचा तपास डीवायएसपी मारूती पंडितांकडे


औरंगाबाद, दि.28 : वाळूखाली पोलिसांचे हात किती दबलेले आहेत याची प्रचिती शनिवारी पुन्हा एकदा आली, बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी वाहतूकदाराकडे तब्बल चार लाख 75 हजार रूपयांची लाच मागितल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र आनंदराव बनसोेडे आणि सहाय्यक फौजदार बाबासाहेब किसनराव दिलवाले हे दोघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली ही कारवाई जालना एसीबीने केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास डीवायएसपी मारूती पंडितांकडे देण्यात आला आहे.
एसीबीच्या सुत्रांनी सांगितले की, एका वाळू व्यवसायिकाने अवैध उपसा करून चित्तेगाव परिसरात ठेवलेली वाळू काही दिवसांपुर्वी तहसिलदारांनी छापा मारून जप्त केली होती. ती बिडकीन पोलिस ठाण्यात व चित्तेगावात ठेवण्यात आली होती, फिर्यादी वाळू व्यवसायिकाने ही वाळू लिलावात विकत घेतली, बिडकीन ठाण्याच्या हद्दीतून या वाळूची वाहतूक करण्यासाठी एपीआय बनसोडे आणि एएसआय दिलवाले यांनी व्यावसायिकाकडे लाच मागितली, पैसे दिले नाही तर वाळू नेऊ देणार नाही, अशी धमकीच या दोघांनी दिलेली होती, व्यावसायिकाने औरंगाबादऐवजी थेट जालना एसीबीकडे तक्रार दिली,

व्यवसायिकाच्या तक्रारीवरून तीन दिवस ठेवली होती पाळत
व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सलग तीन दिवस पाळत ठेवण्यात आली. अखेर आपल्या ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करण्यासाठी बिडकीनचा सहाय्यक निरीक्षक बनसोडे आणि दिलवाले या दोघांनी पंचासमक्ष चार लाख 75 हजार रूपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी बिडकीन ठाण्यात एसीबीच्या वतीने गुन्हा नोंदवून सहाय्यक निरीक्षक बनसोडे आणि सहाय्यक फौजदार दिलवाले या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपाधिक्षक मारूती पंडित हे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!