देश विदेश

कृषी विधेयकावरुन हिंसक आंदोलन; पेटवला ट्रॅक्टर

दिल्ली, दि. २८ (लोकाशा न्यूज) : कृषी विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी सकाळी नवी दिल्लीत इंडिया गेटवर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. राजपथवर कृषी विधेयकावरुन आंदोलन सुरु असताना पंजाब युवक काँग्रेसच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी हा ट्रॅक्टर पेटवून दिला. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकावरुन देशभरात आंदोलन सुरु आहे. सकाळी सात वाजून ४२ मिनिटांनी इंडिया गेटवर ट्रॅक्टरला आग लावण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या दोन गाडया तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. “इंडिया गेटवर १५ ते २० जण जमले व त्यांनी ट्रॅक्टर पेटवून दिला. आग विझवण्यात आली असून, ट्रॅक्टर तिथून हटवण्यात आला आहे. जे यामध्ये सहभागी आहेत, त्यांची ओळख पटवण्यात आली असून तपास सुरु आहे” असे नवी दिल्लीच्या डीसीपींनी सांगितले

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!